- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.अश्यातच शेतातील झाडे तसेच विद्युत खांब कोसळू लागले आहेत.त्यातच आज,शनिवार २४ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील उसेगाव येथील काही शेतकरी लगतच्या शेतशिवारात सकाळच्या सुमारास जनावरे चारायला घेऊन गेले होते.शिवारात जनावरे चरत असतांना दुपारच्या सुमारास उध्दव रोहणकर यांच्या शेतात विद्युत खांबाचे तार तुटलेले होते.दरम्यान,जनावरे चरत जात असताना त्यांचा जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाला.यामध्ये विद्युत शॉक लागून आठ जनावरे दगावली.यामध्ये ६ बैल व २ गायींचा समावेश आहे.सदर घटनेची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा पपंचनामा केला.ऐन शेतीच्या हंगामाच्या वेळेसच शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागल्याने वीज वितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
- Advertisement -

