Friday, June 19, 2026
Homeबीडवाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..! - तब्बल ३ हजार ३०० नोटिसा बजावून १५०...

वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..! – तब्बल ३ हजार ३०० नोटिसा बजावून १५० कोटी रुपयांचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

बीड :-अवैध वाळू उपसा करून गब्बर बनू पाहणाऱ्या माफियांना बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.जिल्ह्यातील एकही ठेका दिलेला नसतांना हजारो ब्रास वाळूची वाहतूक झाल्याचे पाडळशिंगी (ता.गेवराई)येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले.त्यानंतर ४० टिप्पर मालकांना बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तब्बल ३ हजार ३०० नोटिसा बजावून खुलासे मागविले.खुलासे अमान्य केल्यानंतर तब्बल १५० कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला.आता ही दंडाची रक्कम संबंधित वाळू माफियांच्या मालमत्तांवर बोजा म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांशी टिप्पर मालक बीड व गेवराई तालुक्यातील आहेत.बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गेवराईचे तहसीलदार खोमणे यांनी संबंधित तलाठ्यांना याबाबत पत्र दिले असून बोजा चढविण्याचे आदेश त्यात आहेत.संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था,वाळू माफियागिरी,अवैध शस्त्रे,शेकडो शस्त्र परवाने तसेच परळीतील राख माफियागिरी चव्हाट्य आली.यानंतर जिल्हाधिकारी पाठक यांनी या वाळू वाहतुकीचे पाडळशिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.४० माफियांना दंडाची नोटीस बजावली.याविरोधात हायवा मालक न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा नव्याने नोटिसा बजावून ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली.गौण खनिजाचा ट्रॉन्झिट पास व जीपीएस यंत्रणेचे अभिलेख, फास्ट टॅग स्टेटमेंट सादर करण्यासाठी जानेवारी महिन्यात निर्देशित केले होते.त्यानंतर या टिप्पर मालकांनी आपले खुलासे सादर केले.आपण दिलेली नोटीस मुदतबाह्य आहे,नोटिसा बाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत,सीसीटीव्ही फुटेज दिले नाहीत,टोलनाक्यावर राष्ट्रीय मार्ग पोलिस कर्मचारी

असतानाही त्यांनी कारवाई केली नाही,यासह इतर मुद्दे मांडून टिप्पर मालकांनी खुलासा सादर केला होता.तो अमान्य करीत जिल्हाधिकाऱ्यांनी जेवढ्या फेऱ्या तेवढ्या नोटिसा या आधारावर ४० टिप्पर मालकांना तीन हजार ३०० नोटिसा पाठविल्या.प्रत्येक फेरीस चार लाख ५७ हजारांप्रमाणे ३ हजार ३०० फेऱ्यांसाठी १५० कोटी रुपये दंड ठोठावला.आता या दंडाच्या रकमा वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!