Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरवाघरी लावून सस्यांची शिकार करणे सात शिकाऱ्यांना पडले महागात -शिकार करणारे आरोपी...

वाघरी लावून सस्यांची शिकार करणे सात शिकाऱ्यांना पडले महागात -शिकार करणारे आरोपी गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातील…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- बल्लारपूर नियतक्षेत्र कळमना अंतर्गत येत असलेल्या मौजा-पळसगाव तेंदू गोडावून परिसरात सस्यांची वाघरी लावून शिकार होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांना मिळाली.माहितीचे आधारे पळसगाव येथील तेंदू गोडावून मागील परिसरात सापळा रचून एकूण सात शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये दिलीप रामा मेश्राम वय ३७ वर्षे,रा. गोंगले,जि.गोंदिया),राजू काशीराम मेश्राम, वय ३९ वर्षे, रा.उमरी, जि.भंडारा,भोजराम शंकर कोल्हे वय ३४ वर्षे, रा.सोंदळ,जि.गोंदिया,विनोद रामकृष्ण बेंडवार वय ४२ वर्षे, रा.सोंदळ,जि.गोंदिया),सुभाष वासुदेव चन्ने,वय ४४ वर्षे,रा.सोंदळ,ता.जि.गोंदिया, पुरुषोत्तम मोतीराम वलथरे वय ४५ वर्षे,रा.किन्ही,ता. साकोली,फागू पांडुरंग शेंडे वय ५० वर्षे,रा.किन्ही, ता. साकोली, जि.भंडारा यांना एक जखमी ससा व वन्यप्राणी शिकारीचे फासेसह ताब्यात घेतले व जखमी सस्याला उपचाराकरीता वन्यजीव उपचार केंद्र,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.परंतु उपचारादरम्यान ससा काल गुरुवारी ६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.

सदर आरोपींनी सस्यांचे मास खाण्यासाठी सस्याची शिकार केल्याची कबुली दिली.सातही आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये प्राथमिक वनगुन्हा दाखल केला आहे.तसेच वनगुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायदंडाधिकारी,प्रथम श्रेणी न्यायालय,बल्लारपूर येथे हजर करण्यात आले. वनविभागामार्फत सरकारी वकील ॲडव्होकेट संगीता डोंगरे हे सदर प्रकरण पाहत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!