Monday, April 6, 2026
Homeभंडारारेती माफियांची मुजोरी; मंडळ अधिकाऱ्याला उडवण्याचा प्रयत्न..

रेती माफियांची मुजोरी; मंडळ अधिकाऱ्याला उडवण्याचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेती माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.रेती माफिया ‘चोरी तर चोरी वरून शिणाजोरी’ करू लागले असल्याचा प्रकार नुकताच भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पहेला ते बोरगाव खुर्द मार्गावर घडली.अवैध रेती घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकाने मंडळ अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहीर वय ४७ वर्षे आणि महसूल सेवक अमित बावनकर यांच्यासह खासगी कारने शासकीय कामासाठी गोलेवाडीकडे जात होते. पवनीच्या मुख्य मार्गावर त्यांना एमएच ४० बीजी ५१७५ क्रमांकाचा रेतीने भरलेला ट्रक संशयास्पद दिसला.ट्रक तपासल्यावर, रेतीची रॉयल्टी वा इतर दस्तऐवज नसल्याने रेती अवैधपणे नेली जात असल्याचे उघड झाले.दरम्यान,ट्रक मालक आणि त्याचे साथीदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून ट्रक भंडारा रोडच्या दिशेने पळवून नेला.अहीर यांनी कारने ट्रकचा पाठलाग सुरू केला,तेव्हा ट्रक चालकाने गाडी मागे जाऊन अधिकाऱ्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले असून,अधिकारी थोडक्यात बचावले.घटनेनंतर,अहीर यांनी अड्याळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दुचाकीने स्वगावी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने झडप घालून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर...

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत; अंतरगाव उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अंतरगाव येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा प्रभावित झालेला आहे.दुरुस्ती करीता विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत...

आता बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य...

पत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संसाराचा गाडा हाकतांना पतीसोबत तिचे वारंवार खटके उडायचे.संसारातील कलह इतका वाढला की,सततच्या भांडणांमुळे पत्नी मनातून खचली.पती-पत्नीचे पटत नसल्याने महिनाभरापूर्वीच ती आपल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!