Saturday, October 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त"राजस्थान सरकार लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवते; तर महाराष्ट्र सरकारला लोकप्रतिनिधींवर विश्वास कां...

“राजस्थान सरकार लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवते; तर महाराष्ट्र सरकारला लोकप्रतिनिधींवर विश्वास कां नाही?”

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना डावलून ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे.अश्यातच राजस्थानच्या ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे.त्यानुसार,ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ३१ जानेवारी २०२५ पर्यंत संपत आहे आणि अपरिहार्य कारणांमुळे निवडणुका होऊ शकत नाहीत,त्या ग्रामपंचायतींमध्ये निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केले जाईल.तसेच, उपसरपंच व वार्डपंचांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती स्थापन करून गावाचा कारभार लोकप्रतिनिधींच्याच मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र,याउलट परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे लोकशाही धोक्यात आली असून, ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण विकासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राजस्थान सरकार लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवते,तर महाराष्ट्र सरकारला लोकप्रतिनिधींवर विश्वास का नाही? हा लोकशाहीविरोधी आणि ग्रामस्वराज्याला कमजोर करणारा निर्णय आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे.तज्ज्ञांच्या मते,राजस्थान सरकारचा निर्णय लोकशाही,विकेंद्रीकरण आणि ग्रामस्वराज्य मजबूत करणारा आहे.तो महाराष्ट्रासाठीही आदर्श ठरू शकतो.लोकनियुक्त सरपंचांना डावलून प्रशासक बसवल्यास मुख्यमंत्री ग्राम समृद्ध व तत्सम महत्त्वाकांक्षी योजना केवळ कागदावरच राहतील आणि गावांचा सर्वांगीण विकास खुंटेल.गावाच्या वास्तवाशी नाते नसलेल्या अधिकाऱ्यांकडे कारभार दिल्यास ग्रामीण विकासाची गती मंदावते,तर लोकनियुक्त प्रतिनिधींना जबाबदारी दिल्यास विकासकामे आणि योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होते.त्यामुळे, राजस्थान सरकारसारखेच महाराष्ट्र सरकारने लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवावा आणि कार्यरत लोकप्रतिनिधींना ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!