- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या विविध भागात वाघांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.मानवाची किंमत ही केवळ पैश्यापुरतीच उरलेली की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.वाघ हल्ला करतो,एखाद्याचा जीव घेतो अन् कुटुंबीयांना लाखो रुपये देऊन सरली कथा.अश्याच कथेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील मिंथुर गाव नजीकच्या शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेलेला शेतमजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,रविवार ५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.हरिदास महादेव कुबडे वय ५८ वर्षे,रा.मिंथुर, ता.नागभिड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.
शेतकरी हरिदास कुबळे हे नेहमीप्रमाणे काल शनिवारच्या सकाळी शेतपरिसरात असलेल्या मोहाच्या झाडाची फुले वेचण्यासाठी शेतावर गेले होते.सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम राबवली.दरम्यान, मृतक यांचा पुतण्या अक्षय कुबडे शेतात गेला असता त्याला दोन वाघ आणि तीन बछडे दिसून आले.सदरचे दृश्य पाहून अक्षयच्या मनात धडकी भरली आणि त्याच पावली परत जात गावात सदरची माहिती दिली.लागलीच वन विभागास पाचारण करण्यात आले.वनविभागाच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली.मात्र,हरिदास यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने परत आज रविवारच्या सकाळी शेतशिवारात शोधमोहीम राबवली असता हरिदास कुबडे यांचा शेतात छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेने परिसरात धास्ती निर्माण झाली असून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

