Thursday, September 3, 2026
Homeनागपूरमैत्रिणीसोबतची लाँग ड्राइव्हची इच्छा पूर्ण तर झाली; मात्र 'त्याला' पोलिस कोठडीची हवा...

मैत्रिणीसोबतची लाँग ड्राइव्हची इच्छा पूर्ण तर झाली; मात्र ‘त्याला’ पोलिस कोठडीची हवा खावी लागली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-या दुनियेत ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ करणाऱ्यांची संख्या कमी नाही,मात्र एखाद्याला चोरीच्या माध्यमातून इम्प्रेस करतो म्हटले तर त्याचा शेवट केवळ पश्र्चातापच असतो.असाच प्रकार नुकताच नागपुरात उघडकीस आला आहे.चक्क मैत्रिणीला इम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये नाशिकमधील एक चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण चोर बनला.मैत्रिणीला लाँग ड्राईव्हवर नेऊन तो घरी पोहचला अन् काही वेळेतच पोलिसांनी त्याला अटक केली.प्रणिल मोरे वय २८ वर्षे असे त्याचे नाव असून तो सिन्नर,नाशिक येथील रहिवासी आहे.
अलीकडेच विकत घेतलेली सव्वालाख रुपयांची बुलेट रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये लावून २१ मार्चला येथील फिर्यादी उज्जैनला दर्शनाला गेले होते.२४ मार्चला परत आल्यानंतर त्यांना त्यांची बुलेट पार्किंगमध्ये दिसली नाही.ती चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे,उपअधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात हवालदार पुष्पराज मिश्रा,अंमलदार प्रवीण खवसे,मझहर अली यांनी तपास सुरू केला.चोरट्या तरुणाने बुलेट चोरल्यानंतर वर्धा गाठले.तेथे हेल्मेट नसल्याने त्याला ट्रॅफिक पोलिसांनी रोखले आणि चलान फाडले.त्याचा मॅसेज बुलेट मालकाच्या मोबाईलवर आला.तपासासाठी तोच क्लू ठरला.बुलेट मालकाने पोलिसांना ती माहिती देताच रेल्वे पोलिसांचे पथक वर्धा येथे पोहोचले.तेथे बुलेट चालविणाऱ्यासोबत एक तरुणी होती,तेदेखील स्पष्ट झाले.तेथून तो अमरावतीमार्गे अकोल्याकडे जाणार असल्याचेही उघड झाले.पुढे बोरगाव मंजू (अकोला) येथेसुद्धा ट्रॅफिक पोलिसांनी त्याची चलान बनविली. यावेळी तेथील ट्रॅफिक शिपायाने बुलेट चालकाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेऊन त्याचा नंबरही घेतला. पुन्हा चलानचा मॅसेज बुलेट मालकाच्या मोबाईलवर आला.यावेळी चोरट्याचा मोबाइल नंबर मिळाल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना कळत होते.त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी नाशिक मार्गावरच्या पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणी करून त्यांची मदत घेतली. त्यामुळे मैत्रिणीला घरी सोडून प्रणिल स्वतःच्या घरी पोहोचताच त्याच्या मागावर असलेले पोलिस तेथे धडकले.त्याला जेरबंद करण्यात आले.त्याची मैत्रिणीसोबतची लाँग ड्राइव्हची इच्छा तर पूर्ण झाली मात्र चोरी अंगलट आल्याने त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!