Saturday, September 12, 2026
Homeनागपूरपंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या एकदिवसीय दौऱ्यावर.. - तब्बल ८ वर्षानंतर दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या एकदिवसीय दौऱ्यावर.. – तब्बल ८ वर्षानंतर दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला देणार भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी,३० मार्च रोजी नागपूरच्या एकदिवसीय दौऱ्यावर असणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवार दौऱ्याच्या निमित्ताने एसपीजीचे पथक नागपुरात दाखल झाले असून,काल गुरुवारी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत चारही ठिकाणे तसेच दौऱ्याच्या मार्गावरील सुरक्षा बंदोबस्ताबाबत सखोल नियोजन करण्यात आले. नागपुरात मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांसह चार हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.बाहेरील जिल्ह्यांमधूनही १५० अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे पंतप्रधानांचे स्वागत केले जाईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म व गोल्डन कलरमध्ये दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह पंतप्रधान मोदी यांना भेट दिले जाईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते थेट रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराकडे रवाना होतील,तेथून ते दीक्षाभूमीला जातील व त्यानंतर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात पोहोचतील.तेथून ते सोलार एक्सप्लोझिव्हला भेट देणार आहेत व दुपारी १.३० वाजेच्या सुमारास छत्तीसगडला रवाना होणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे तब्बल ८ वर्षानंतर दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.यावेळी ते जवळपास १५ मिनिटे दीक्षाभूमीवर राहतील.यापूर्वी मोदी जेव्हा दीक्षाभूमीवर आले होते तेव्हा त्यांनी मध्यवर्ती स्तुपामध्ये पाच मिनिटे ध्यानसाधना केली होती.त्यामुळे यंदाही पंतप्रधानांच्या ध्यानसाधनेसाठी स्तुपामध्ये विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.१४ एप्रिल २०१७ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती.त्यावेळी ते नागपुरात जवळपास साडेतीन तास थांबले होते तर दीक्षाभूमीवर त्यांनी तब्बल २० मिनिटे घालवली होती.त्यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्मारकामध्ये ध्यानसाधनाही केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!