Saturday, May 2, 2026
Homeकुरखेडामावळत्या वर्षाला रक्तदानाने निरोप देण्याची १५ वर्षाची परंपरा कायम राहणार.. - सत्कार्यात...

मावळत्या वर्षाला रक्तदानाने निरोप देण्याची १५ वर्षाची परंपरा कायम राहणार.. – सत्कार्यात सहभागी होण्याचे आवाहन.. – कुरखेडा नगर पंचायतीचे नगरसेवक सागर निरंकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-स्वर्गीय विक्रांत वारजूरकर व स्वर्गीय जिग्नेश धंधूकीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ मागील १५ वर्षांपासून कुरखेडा शहरातील युवक मंडळी पुढाकार घेत नविन वर्षाचे स्वागत सत्कार्यात व्हावे व नव्याने रूजू झालेली हूळदंगी परंपरेला आळा बसावा; या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी मावळत्या वर्षाला रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे स्वागत करण्याची १५ वर्षापासूनची परंपरा यावर्षी सूद्धा कायम राहणार असल्याने युवकांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे; असे आवाहन कुरखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक सागर निरंकारी यांनी केले आहे.
अलीकडे मावळत्या वर्षाला निरोप देतांना व नविन वर्षाचे स्वागत करतांना नविन युवकांची पीढी बेभान होत व्यसनाधिनतेचा कळस गाठत आहे.नव्या पीढीत नको त्या व्यसनाचा शिरकाव थर्टी फर्स्ट निमित्त आयोजित होणाऱ्या पार्टी मधूनच होत असतो.या रूजू झालेल्या वाईट परंपरेला फाटा देण्याकरीता मागील १५ वर्षांपासून कुरखेडा येथील काही सामाजिक कार्यकर्ते पूढाकार घेत युवकांना वर्षाचा निरोप व नविन वर्षाचे स्वागत थर्टी फर्स्ट चा हूळदंग पणाने न करता रक्तदान करीत आपली सामाजिक जाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.या उपक्रमाला मागील १५ वर्षांपासून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.यावर्षी सुद्धा मंगळवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दूपारी १ वाज़े दरम्यान सिंधी भवन कुरखेडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात मोठ्या संख्येनी युवकांनी सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी; असे आवाहन नगरसेवक सागर निरंकारी, मधुकर वारजूरकर,यशपाल सहारे,सोनू रहांगडाले, विवेक निरंकारी,प्रवेश सहारे,मयुर सहारे, आशु बागडे गोलू वैद्य,नौशाद सय्यद,पंकज टेंभूर्णे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!