Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा फुलेंना अभिवादन…

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा फुलेंना अभिवादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील माळी समाज बांधव,गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक-२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून गावातील माळी समाज भवनात अभिवादन करण्यात आले.

अभिवादन प्रसंगी गावातील मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले,विद्येची देवता सावित्रीमाई फुले,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.महात्मा फुले हे मराठी लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला.२८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. “थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा; आपणही त्यांच्या समान व्हावे; हाच सापडे बोध खरा” अशा विचार सरणीला जतन करून आज २८ नोव्हेंबर रोजी माळी समाज कोंढाळातर्फे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आले.अभिवादन करतेवेळी गावातील प्रथम नागरिक कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी, माजी सरपंच कैलास राणे,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,प्राध्यापक पंकज धोटे,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तुपट,युवक काँग्रेसचे तालुका सचिव आक्रोश शेंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे,लोकमतचे पत्रकार नितेश पाटील,माळी समाजाचे अध्यक्ष नामदेव वसाके,उपाध्यक्ष मारोती गुरूनुले,सचिव केशव वसाके,कोषाध्यक्ष महागु गुरुनुले,देवराव वसाके,सुमित बोरुले,विकास मोहुर्ले,नामदेव गुरुनुले,पार्वता बोरुले,उर्मिला मोहुर्ले,रोशन ठाकरे,युवराज बेदरे, भोजराज राऊत,माळी समाज बांधव व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!