Friday, June 19, 2026
Homeगोंदियामालवाहू ट्रक ची बस,ट्रक व पोलीस वाहनाला जबर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू..

मालवाहू ट्रक ची बस,ट्रक व पोलीस वाहनाला जबर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- मालवाहू ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून एसटी बस,ट्रक व त्यानंतर पोलीस वाहनाला जबर धडक दिल्याची घटना काल दिनांक- २२मे रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास शहरातील रिंगरोड परिसरात घडली.या विचित्र अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला.तर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांसह चारजण गंभीर जखमी झाले.

साहिल कुडमेते रा.चंद्रपूर असे मृत युवकाचे नाव आहे.पोलीस निरीक्षक दिनेश लबडे,वाहन चालक मुरलीधर पांडे रा.गोंदिया, आकाश गावतुरे रा.वडसा, पियुष टेंभुर्णी रा.चंद्रपूर अशी जखमींची नावे आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,शहरातील सहयोग हॉस्पिटल,अवंती चौक परिसर ते रेल्वे क्रॉसींग दरम्यान आरोपी आयसर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवत होता. दरम्यान समोरील परिसरात एका एसटी बसला धडक दिली.ज्यामध्ये बरेचसे नुकसान झाले.यानंतर सदर ट्रकने समोरील ट्रकलाही धडक दिली.तर आणखी पुढे जात रेल्वे क्रॉसींग द्वारका लॉन समोरील स्पीड ब्रेकरवर पोलीस वाहनासही जोरदार धडक दिली. ज्यामध्ये पोलीस वाहन उडून परत जागेवरच ते स्थिर झाले.यामध्ये पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व वाहन चालक मुरलीधर पांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या विचित्र भिषण अपघातात ४ ते ५ वाहने एकमेकांना धडकल्याने दुचाकीस्वार साहिल कुडमेते या युवकाचा मृत्यू झाला.तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.सदर वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!