Wednesday, September 23, 2026
Homeनागभिडवैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही परवाना नसलेल्या एका बोगस बंगाली डॉक्टरला अटक…नागभिड तालुक्यातील घटना..

वैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही परवाना नसलेल्या एका बोगस बंगाली डॉक्टरला अटक…नागभिड तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागभिड(चंद्रपूर) :- वैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही परवाना नसताना बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला नागभिड तालुक्यात कानपा गावी अटक करण्यात आली आहे.बिशू संतोष सरकार वय ३० वर्षे असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.ही कार्यवाही जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीच्या चौकशीवरून करण्यात आली आहे.या कार्यवाहीमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

ग्रामीण भागातील गावामध्ये अनेक बोगस व्यक्ती परवाना नसतानाही डॉक्टरकीचा व्यवसाय करतात व ग्रामीण जनतेची लूट करतात.कधीकधी तर बोगस डॉक्टरकीमुळे नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत.त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यावसायिकावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे.

याच समितीने नागभीड तालुक्यात वैद्यकीय विभागाच्या समितीने पाहणी केली.या दरम्यान तालुक्यातील कानपा येथे कावळे यांच्या घरी बंगालमधील बिशू सरकार हा व्यक्ती कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना चौकशीत आढळून आला.समितीने बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात छापा टाकला असता अलिओपॅथी औषधे जप्त करण्यात आली. यावरून तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार नोंदविली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!