Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरमहाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू,तर १७ जण जखमी..

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू,तर १७ जण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,तर १७ जण जखमी झाल्याची घटना आज,रविवार १५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ घडली.भूषण विजय दोडके वय १७ वर्षे, रा.पाटाळा, ता.भद्रावती,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.घटना घडताच सर्व जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आज महाशिवरात्री असल्याने अनेक भाविक भक्त शिवाची पूजा अर्चना करण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गेले होते.अश्याच प्रकारे पाटाळा परिसरातील शिवभक्त एमएच ३४ बी झेड ९४७८ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते.दर्शन करून परत येत असतांना सर्वजण पाटाळा गावाजवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाला. यात १७ वर्षीय तरुण वाहनाखाली दबल्याने जागीच मृत पावला.तर १७ भाविक जखमी झाले.यात पाच जण किरकोळ जखमी झालेत.किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आवारी,गुरुवेश राजेश जाधव वय १४ वर्षे,ओंकार शिवशंकर मांढरे वय ९ वर्षे,प्रतीक पारखी आणि रोहित झाडे यांचा समावेश आहे.यांचेवर वरोरा रुग्णालयात उपचार करण्यात आले.तर गंभीर जखमींमध्ये नानाजी मरस्कोल्हे वय ७० वर्षे,गणेश खापणे वय ४० वर्षे,मारोती शिवरकर वय ४५ वर्षे,विनोद गौरकर वय ५० वर्षे,रोशन माडवे वय १७ वर्षे,मारोती बदखल वय ५० वर्षे,सोहम भोयर वय १६ वर्षे,मयूर वनशिंगे वय १६ वर्षे,राजू किसन शिवरकर वय ४२ वर्षे,राजू जाधव वय ४० वर्षे,मंथन डाहूले वय १३ वर्षे,लकी भडके वय २० वर्षे अशी जखमींची नावे असून यांचेवर चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने पाटाळा व राळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!