Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजमहाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या बोगस औषधी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा......

महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या बोगस औषधी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा… – शिवसेना उबाठाचे डॉ.श्रीकांत बनसोड यांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील तसेच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी होत असलेल्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस औषधांचा पुरवठा आणि साठा आढळून आल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गोरगरीब रुग्णांच्या सेवेत शासकीय रुग्णालयाद्वारे गोरगरीब रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात औषधे मिळावी या उद्देशाने शासकीय रुग्णालयात औषधांचा वाटप केला जातो.परंतु अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात तसेच नागपूरच्या रुग्णालयामध्ये बोगस औषधांचा पुरवठा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.बोगस औषधांच्या वाटपामध्ये गुजरात येथील व कोल्हापूर येथील काही कंपन्यांचे नाव समोर आले असून त्यांनी पुरवठा केलेल्या औषधांमध्ये योग्य प्रमाणात औषधांचे कंटेंट नसल्याचे व गुणवत्ता शून्य असल्याचे निदर्शनात आल्याने,अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे.सोशल मीडियातून सुध्या महाराष्ट्रात जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषारी औषध साठा ह्या सदराखाली बातम्या प्रसिद्ध झाल्याने,गडचिरोली जिल्ह्यातील गोर-गरीब आदिवासी रुग्ण पुरते धास्तावलेले असून,शासकिय रुग्णालयातील सेवेला आणि औषधांना घाबरत असून त्याचा वापर करताना शंकांना पेव फुटलेला आहे. अशातच अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केवळ या दोन तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सदरच्या कंपन्यांकडून औषध साठा पुरवठा झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरच्या बोगस औषधांच्या वापराने आणि सेवनाने ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेच्या आरोग्याचा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलेला आहे.बोगस औषध देऊन रुग्णांची बोळवन करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनात येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब जनता लाभ घेत असल्याने गडचिरोली जिल्ह्यामध्ये या कंपन्यांकडून सदर बोगस औषधांचा पुरवठा झाला किंवा नाही? झाला असल्यास नेमका त्याचा साठा किती आहे? याची समिती नेमून चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत बनसोड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंजचे नायब तहसीलदार विलास तुपट यांना शिवसैनिकांसह निवेदन देत प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.सदर निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज तालुक्याचे उपतालुकाप्रमुख विलास ठाकरे, विभाग प्रमुख होमराज पाटील गायकवाड,वैद्यकीय आघाडीचे उपजिल्हा प्रमुख डॉ.मंडल सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!