Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोली१ दिवसीय नवजात बालकास रस्त्यावर सोडले.. - बालकाचा ताबा मिळणेकरिता संपर्क साधण्याचे...

१ दिवसीय नवजात बालकास रस्त्यावर सोडले.. – बालकाचा ताबा मिळणेकरिता संपर्क साधण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्याच्या खरपुंडी ते आकरटोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला दिनांक-
२१ ऑक्टोंबर २०२४ रोजी १ दिवसीय नवजात बालक आढळून आला होता.नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनला याबाबत कळविले.त्यानुसार गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सदर बालकास बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या समक्ष सादर केले.त्यानुसार बाल कल्याण समितीने गडचिरोलीतील लोक कल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था व्दारा संचालीत गडचिरोली पंचवटी वॉर्ड,बजरंग नगर,हनुमान मंदिराच्या पाठीमागे गडचिरोली या विशेष दत्तक संस्थेत दाखल केले.मात्र, २१ ऑक्टोंबर २०२४ पासून अजूनपर्यंत बालकाचे जैविक माता-पिता वा नातेवाईक कोण? याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.त्यामुळे
 सदर बालकाचे जैविक माता-पिता व नातेवाईक यांनी बालकाचा ताबा मिळणेकरिता बातमी प्रकाशीत झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय बॅरेक क्रमांक-१,खोली क्रमांक-२६,२७ कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली मोबाईल क्रमांक-९४०३७०४८३४ (9403704834),दुरध्वनी क्रमांक:-०७१३२-२२२६४५(07132-222645)यावर संपर्क साधावा व दिलेल्या मुदतीत वा तारखेस संपर्क साधला नाही तर केंद्रिय दत्तक प्रधिकरण (CARA) नवी दिल्ली यांचे अधिसुचनेनुसार दत्तक प्रक्रिये करिता सदर बालकास बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये दत्तकाकरिता विधी मुक्त करुन सदर बालकाची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!