Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून सिकलसेल नियंत्रण सप्ताह.. - नियमित व विशेष गाव निहाय,शाळानिहाय सह इतर...

उद्यापासून सिकलसेल नियंत्रण सप्ताह.. – नियमित व विशेष गाव निहाय,शाळानिहाय सह इतर लाभार्थ्यांची होणार तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबवला जाणार आहे.यामध्ये नियमित व विशेष गाव निहाय, शाळा निहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे.  सध्या जिल्ह्यात एकूण ४१ हजार २५८ सिकलसेल वाहक आणि २ हजार ९७८ सिकलसेल ग्रस्त रुग्ण आहेत.यामध्ये सिकलसेल ग्रस्त रुग्णांचे सिकलसेल क्रायसिस,तीव्र रक्ताशय व आवश्यक आरोग्य तपासणीसाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.
सिकलसेल ग्रस्त रुग्णांना क्रायसिस होऊ नये आणि वारंवार रक्त लावण्याची गरज पडू नये म्हणून हैड्रोक्सियूरिया हे औषध सर्व रुग्णांना सुरु करण्याचे ध्येय आहे.सध्या जिल्ह्यात एकूण ९२९ रुग्णांना हैड्रोक्सियूरिया हे औषध सुरु केले असून त्यांच्या आरोग्यात उत्कृष्ट असा बदल झाला आहे.याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्व गरोदर स्त्रियांची प्रसूतीदरम्यान सिकलसेल तपासणी आणि ज्या स्त्रिया वाहक किंवा रुग्ण आढळल्यास त्यांच्या पतींची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे.जेणेकरून सिकलसेल असलेले जोडप्याचे २० आठवड्याच्या आत गर्भजल चाचणी करून होणारे अपत्य हे सिकलसेल रुग्ण तर नाही? हे जाणून घेता येते व ते जोडप्यांना गर्भपातासाठी समुपदेशन करून टाळता येते.यासाठी जिल्ह्यात संकल्प फाऊंडेशन आणि क्र्सना डॅग्नोस्टिकस कार्यरत आहेत.
ऑक्टोंबर २०१८ पासून जिल्ह्यात एकूण ११ हजार ५४९ गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे. त्या पैकी १२६ स्त्रिया या सिकलसेल वाहक म्हणुन  व १७ जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले. अश्या सर्व १७ स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात आली आहे.या १७ पैकी ३ स्त्रियाच्या तपासणीत होणारे अपत्य हे सिकलसेल रुग्ण आढळून आले आणि त्या पैकी २ जोडप्यांना होणारे अपत्य सिकलसेल रुग्ण होऊ नये व त्यांनी आयुष्यभर यातना सोसू नये म्हणून वैद्यकीयरित्या गर्भपात केले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात नवीन जन्माला येणारे बाळ सिकलसेल आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व आरोग्य संस्थावर सिकलसेल वाहक असलेल्या जोडप्यांची गर्भजल तपासणी सुरु करण्यात येत आहे.
नवजात बालकाला सिकलसेल आजार तर नाही?यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नवजात बालकाचे जन्माच्या ७२ तासामध्ये तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी हिंद लॅब मार्फत प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर सुरु करण्यात येत आहे.सन २०२३ पासून एकूण ८८५९ नवजात बालकांची तपासणी करण्यात आली आहे आणि येत्या काळात सर्वच नवजात बालकाची तपासणी प्रत्येक आरोग्य संस्थांवर करण्यात येईल,असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.
तसेच सिकलसेल हे आजार पुढच्या पिढीत होऊ नये म्हणुन लग्नापूर्वी तपासणी आणि २ सिकलसेल आजाराच्या वाहकांचे लग्न होऊ नये म्हणुन प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर आरोग्य कर्मचारी हे समुपदेशन करीत आहेत.उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप  स्थापन करण्यात आला आहे; जेणेकरून सर्व सिकलसेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीचा नियम औषदाशीत,आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येईल.जिल्ह्यात सिकलसेलचे नवीन रुग्ण होऊ नये व असलेल्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग तत्पर आहे.हा कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रांसाठी PATH आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याची माहिती जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!