Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजमतदानपूर्व तयारीची कामे पूर्ण; मतदानाकरिता प्रशासन सज्ज.. - देसाईगंज नगर परिषद निवडणूक...

मतदानपूर्व तयारीची कामे पूर्ण; मतदानाकरिता प्रशासन सज्ज.. – देसाईगंज नगर परिषद निवडणूक सबंधाने मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान पार पड़णार आहे.या अनुषंगाने देसाईगंज नगर परिषदेची  मतदानपूर्व तयारीची कामे जवळपास पूर्ण झाली असून मतदानाकरिता प्रशासन सज्ज झाले आहे.दरम्यान काल गुरुवारी देसाईगंज नगर परिषदेचे सांस्कृतिक सभागृह येथे मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले.या प्रशिक्षण सत्रात राखीव मतदान पथकांसह एकुण ४३ पथकांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार प्रिती डुडूलकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सतीश चौधरी यांचे मार्गदर्शनात पार पडले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा देसाईगंजचे तहसीलदार प्रिती डूडूलकर यांनी मतदान पथकांतील मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी १,२ व ३ यांचे मतदानापूर्वी व मतदान संपल्यानंतरचे मतदान पथकांची कामे,कर्तव्य व जबाबदाऱ्या,ईव्हिएमचे विविध भाग व त्यांचे कार्य,निवडणूक कामाकरीता लागणारी विविध प्रपत्रे व दस्ताऐवज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हॅन्डस् ऑनचे माध्यमातून ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रात्याक्षिक करुन दाखविले तसेच  प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष ईव्हीएम यंत्राची हाताळणी करुन ईव्हीएम बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.यावेळी नगर परिषद निवडणूकीकरीता नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी १,२ व ३ तसेच ईतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!