Monday, August 31, 2026
Homeगोंदियानिविदा न काढताच बिल काढणे,आयोगाच्या निधीची अफरातफर करणे; ग्रामसेवक निलंबित..

निविदा न काढताच बिल काढणे,आयोगाच्या निधीची अफरातफर करणे; ग्रामसेवक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गाव विकासासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो.काही ग्रामपंचायती गाव विकासाकडे लक्ष घालतात तर काही ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी मिळून गाव विकास न करता भकास कामे करून रक्कम गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील ब्राम्हणी(पाथरी)  ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवकाचा अजब-गजब कारनामा उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.संजू भुरा खोब्रागडे,असे निलंबन झालेल्या ग्रामसेवकाचे नाव असून सदरची कारवाई गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा(वर्तणूक)नियम १९६७ मधील नियम ३ च्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी केली आहे.
संजू खोब्रागडे यांनी २०२२-२३,२०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये आलेल्या निधीची वार्षिक निविदा न काढता देवांश ट्रेडर्स या कंत्राटदाराच्या नावाने बिल काढले आणि देवांश ट्रेडर्सच्या नावाने आपल्या बँक खात्यावर अवैधरित्या रकमेची देवाण-घेवाण केली. त्यातच,१५ व्या वित्त आयोगातील निधीत अफरातफर करून ग्रामपंचायतीकरीता श्री शक्ती कॉम्प्युटर्स अँड मोबाईल यांच्याकडून खरेदी प्रकरणात अफरातफर केल्याचे दिसून आले.अश्यातच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांना केराची टोपली दाखवली.अशातही चौकशी सुरू असतांना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचे चौकशीत आढळून आले.याबाबत वारंवार सूचना देऊनही वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.यांनी निलंबनाची कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!