- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-साकोलीच्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने (एसीबी)रंगेहात पकडले असून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक आर.जी.ब्रम्हपुरीकर वय ४३ वर्षे व छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिन्हेपुंजे वय ३३ वर्षे अशी लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.६५ वर्षीय तक्रारदाराची साकोली तालुक्यातील जांभळी येथे भूमापन क्रमांक-३७७ मध्ये ०.५१ हेक्टर शेती असून ती अकृषक करण्याकरिता त्यांनी २९ मार्च २०२३ रोजी नगर रचनाकार भंडारा यांच्याकडे अर्ज केला होता.हा अर्ज साकोली तहसीलदार कार्यालय आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना पाठविण्यात आला होता.त्यानुसार तक्रारदाराने १६ सप्टेंबर रोजी साकोलीच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे नकाशाच्या मोजणीसाठी अर्ज केला आणि गिन्हेपुंजे यांची भेट घेतली.नगर रचनाकार यांचे पत्र जुने आहे.ते चालणार नाही,नवीन पत्र आणावे लागेल,असे तक्रारदाराला सांगितले.तक्रारदाराने त्यांना पुन्हा विनंती केली असता प्रवीण गिन्हेपुंजे व राहुल ब्रम्हपुरीकर यांनी एकमेकांशी संगनमत करून २० हजार रुपयांची मागणी केली.त्यामुळे २५ सप्टेंबरला तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.पडताळणीदरम्यान दोन्ही आरोपींनी तडजोडीअखेर १५ हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार काल, शुक्रवारी २७ सप्टेंबरला सापळा रचून प्रवीण गिन्हेपुंजे याने स्वतःकरिता व राहुल ब्रह्मपुरीकर यांच्यासाठी पंचासमक्ष तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली.या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार,पोलिस निरीक्षक अमित डहारे, उपनिरीक्षक संजय कुंजरकर,हवालदार मिथुन चांदेवार,नायक अतुल मेश्राम,अंकुश गाढवे,शिपाई राजकुमार लेंडे यांनी केली.
- Advertisement -

