Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईभारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटींचे महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस…

भारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटींचे महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा २९ जून रोजी जिंकली.या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.यासाठी आता महाराष्ट्र शासनाकडून भारतीय संघाला मोठे बक्षीस देण्यात येत आहे.

या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला.यानंतर आज,शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाचे कौतुक करण्यात आले.

याबरोबरच टी -२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू रोहित शर्मा,शिवम दुबे,सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे व मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही महाराष्ट्र शासनाकडून सत्कार करण्यात आला.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर विधान भवनातही या खेळाडूचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा गौरव सोहळा पार पडला.दरम्यान,यापूर्वीच महाराष्ट्राच्या चारही खेळाडूंना १ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती.यानंतर आता विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण भारतीय संघासाठी ११ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. त्याचबरोबर आगामी काळात नव्या स्टेडियमसाठी जमीनीची वैगरे गरज भासल्यास त्यासाठीही मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!