Wednesday, August 26, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता; २३ पैकी २१ जागांवर काँग्रेस.. - एकजण...

ब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता; २३ पैकी २१ जागांवर काँग्रेस.. – एकजण सात मताने,तर एकजण एका मताने विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का देत २३ जागांपैकी तब्बल २१ जागांवर विजयी पताक्याची मोहर उमटवली.विशेष म्हणजे,भाजपचे मनोज भूपाल अवघ्या ७ मतांनी,तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अविनाश राऊत हे १ मतांनी विजयी झाले; अन्यथा २३ पैकी २३ जागा काँग्रेसने जिंकल्या असत्या.आज,रविवार २१ डिसेंबर रोजी राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल घोषित करण्यात आले. विधानसभेत पिछाडीवर गेलेल्या काँग्रेसने विदर्भात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.अश्यातच काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी रणनीती आखून काँग्रेसच्या पदरात नगराध्यक्ष पदासह ब्रम्हपुरी नगर परिषदेत स्पष्ट बहुमताचा झेंडा फडकवला.नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगेश बालाजी मिसार यांना १५ हजार ४०८ मते मिळाली,तर माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्षाचे प्रा.सुयोग बाळबुद्धे यांना ५ हजार ८३५ मते मिळाली असून त्यांचा तब्बल ९ हजार ५७३ मतांनी दारुण पराभव झाला.
नगराध्यक्ष– योगेश बालाजी मिसार –काँग्रेस
  • नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार👇
१.प्रभाग क्रमांक- १-अ- काजल तलमले –काँग्रेस
ब- चंद्रकांत बावनकुळे – काँग्रेस
२.प्रभाग क्रमांक- २-अ- बबिता आमले –काँग्रेस
 ब- प्रकाश खोब्रागडे – काँग्रेस
३.प्रभाग क्रमांक-३ -अ- मनोज कावळे – काँग्रेस
ब- रेणू ठेंगरे –काँग्रेस
४.प्रभाग क्रमांक- ४ -अ- अनुकूल शेंडे –काँग्रेस
 ब – जयश्री कुथे –काँग्रेस
५.प्रभाग क्रमांक- ५- अ – सतीश हुमणे – काँग्रेस
ब- रंजना पिसे – काँग्रेस
६.प्रभाग क्रमांक- ६ -अ- हेमलता सिंहगडे –काँग्रेस
ब – जगदीश पिलारे –काँग्रेस
७.प्रभाग क्रमांक- ७ -अ- गीता मेश्राम –काँग्रेस
ब- सचिन राऊत – काँग्रेस
८.प्रभाग क्रमांक-८ -अ- पुष्पलता पोपटे –काँग्रेस
ब -नितिन उराडे –काँग्रेस
९.प्रभाग क्रमांक -९ -अ- मनोज भूपाल – भाजपा
ब -सपना बल्लारपुरे – काँग्रेस
१०.प्रभाग क्रमांक- १०- अ – राकेश पडोळे –काँग्रेस   ब – ज्योती राऊत –काँग्रेस
११.प्रभाग क्रमांक -११- अ -माधुरी उपासे –काँग्रेस
ब – रंजना बुराडे –काँग्रेस
क – अविनाश राऊत – राष्ट्रवादी काँग्रेस
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!