- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-तालुक्यातील भोजापूर येथे एका तरुण डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,सोमवारी २१ ऑक्टोंबरच्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हर्षल पन्नालाल शेंडे वय २९ वर्षे असे गळफास घेतलेल्या डॉक्टरचे नाव असून,नंदनवन आयुष क्लिनिक या नावाने तो भोजपूर येथे दवाखाना चालवत होता.
डॉक्टर हर्षल पन्नालाल शेंडे हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील होता.दोन वर्षांचा असताना वडिलाचे छत्र हरवले.त्यामुळे त्याची आई माहेरी भोजापूर येथे आली.त्यामुळे मामा उमेश बांते यांनी सांभाळ केला.आई भोजापूर येथे अंगणवाडी
शिक्षिका आहे.त्याचे बीएएमएसपर्यंत शिक्षण झाले होते.गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून गावीच नंदनवन आयुष क्लिनिक नावाने तो दवाखाना चालवीत होता. काही महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयमध्येही वैद्यकीय सेवा देत होता.
पुण्यावरून प्रशिक्षण आटोपून हर्षद रविवारी गावी आला.त्यानंतर काल,सोमवारी सकाळी दवाखाना उघडला.मात्र,दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी दवाखान्यात जाऊन बघितले असता शटर आतून बंद होते.शटर उघडून बघितले असता,केबिनमध्ये असलेल्या पंख्याला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही कळू शकले नाही
- Advertisement -

