- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीसाठी आज, मंगळवार २२ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व तीन विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांना त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.
निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून कार्यालयांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन,व्हीव्हीपॅट मशीनही सज्ज करून ठेवण्यात आल्या आहेत.तसेच मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम👇
१) मंगळवार दिनांक- २२ ऑक्टोंबर नामनिर्देशन सादर करण्यास सुरुवात
२) मंगळवार दिनांक- २९ ऑक्टोंबर नामनिर्देशन सादर करण्याचा अंतिम दिनांक
३) बुधवार दिनांक-३० ऑक्टोंबर नामनिर्देशपत्र छाननी
४) सोमवार दिनांक-४ नोव्हेंबर नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत
५) बुधवार दिनांक- २० नोव्हेंबर मतदान
६) शनिवार दिनांक-२३ नोव्हेंबर मतमोजणी
- Advertisement -

