Monday, July 13, 2026
Homeनागपूरस्ट्रेचरवरून नेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून मागितले शंभर रुपये; कर्मचारी निलंबित

स्ट्रेचरवरून नेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून मागितले शंभर रुपये; कर्मचारी निलंबित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रुग्णाला कॅज्युल्टीमध्ये पोहोचविण्यासाठी
लागणाऱ्या स्ट्रेचरसाठी नातेवाइकाकडून १०० रुपयांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधीक्षकांनी अधिष्ठात्यांच्या सूचनेवरून तडकाफडकी निलंबित केले.हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या मेडिकलमध्ये घडला आहे.या कठोर कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शासकीय रुग्णालयात वेळेत स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर मिळणे आणि ते ओढण्यासाठी कर्मचारी मिळणे दुर्मीळच.विशेष म्हणजे,रुग्णांना ही सेवा देण्यासाठी मेडिकलमध्ये अटेंडंट ‘आउट सोर्सिंग’ करण्यात आले. यावर सरकारचे लाखो रुपये खर्च होत आहेत; परंतु कर्मचारी स्ट्रेचर तर ओढत नाही,उलट स्ट्रेचरसाठी पैशांची मागणी करीत असल्याचा प्रकार पुढे आल्याने
खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार,शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक नातेवाईक आपल्या रुग्णाला घेऊन मेडिकलच्या मेडिसिन कॅज्युअल्टीमध्ये आला.रुग्णाला उभेही राहता येत नसल्याने त्याने प्रवेशद्वाराजवळ कार्यरत कर्मचारी विजय अतकरकडे स्ट्रेचरची मागणी केली.कर्मचाऱ्याने आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र जमा केल्यावरच स्ट्रेचर मिळण्याची अट टाकली.स्ट्रेचर परत आणल्यावर ओळखपत्र परत करण्याची हमीही दिली.नातेवाइकाकडे ओळखपत्र नव्हते.त्यामुळे कर्मचाऱ्याने १०० रुपये ठेवण्यास सांगितले.नातेवाइकाने पैसे दिले.रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून कॅज्युअल्टीमध्ये नेले.उपचार झाल्यानंतर स्ट्रेचर परत न करता कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षक डॉ.गावंडे यांच्याकडे केली. कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याची कबुली दिली,याची माहिती अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांना दिली.त्यांनी लगेच अतकरवर कारवाई करण्याचा सूचना केल्या. त्यानुसार, डॉ.गावंडे यांनी कर्मचाऱ्याला काल,सोमवारी निलंबित केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!