Tuesday, April 28, 2026
Homeचंद्रपूर'प्रेम हे प्रेमच असते चिरकाल टिकले तर सेम असते'.. जात आडवी येण्याच्या...

‘प्रेम हे प्रेमच असते चिरकाल टिकले तर सेम असते’.. जात आडवी येण्याच्या भीतीने तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेतली.. – फेसबुकवर ओळख झालेले विवाह बंधनात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आजकाल प्रेम कुठून फुलून येणार,याचा काही नेम नाही.पूर्वी समोरा-समोर एकमेकांकडे टकमक पाहून, जवळ जाऊन प्रेम व्यक्त केले जात होते.मात्र,आता प्रेम प्रगट होण्याचा ट्रेण्ड बदलला आहे.असो काही कां असेना,पण ‘प्रेम हे प्रेमच असते चिरकाल टिकले तर सेम असते’,नाही तर दि एंड असते.त्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी येथील २२ वर्षीय आशिष चौधरी याची चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथील १९ वर्षीय विद्या कन्नाके या तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली.दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली.त्यानंतर भेटी-गाठी वाढल्या.एका मंदिरात पहिल्यांदाच एकमेकांचे दर्शन झाले.प्रेमसंबंध वाढत गेल्याने प्रेमाच्या आणाभाका घेत विवाह बंधनात अडकण्याचा दोघांनीही निश्चय केला.मात्र,आडकाठी ठरत होती ती जात.त्यामुळे काय करावे? या पेच प्रसंगात दोघेही पडले.अशातच जे होणार ते पाहू,असे म्हणीत मुलीने प्रियकराचे घर गाठले.त्यामुळे दोघांनीही लग्न लावून देण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती नाचनभट्टी यांच्याकडे अर्ज सादर केला.कागदपत्रांची तपासणी करून समितीच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोपस्कर पूर्ण करून हिंदू विवाह पद्धतीने दोघांचेही लग्न लावून दिल्याने अखेर प्रेमीयुगुल विवाह बंधनात अडकले.प्रसंगी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामकृष्ण झाडे, ग्रामपंचायत सदस्य परमानंद चहांदे,सुभाष कोडापे, मच्छिंद्र रामटेके,कवड्डू चौधरी,सुरेश कोल्हे,जयंत नागोसे,  श्याम चौधरी,कैलास श्रिरामे,राहुल चौधरी,किरण सावसाकडे,विमल चौधरी तसेच मुलाचे नातेवाईक, तंटामुक्त गाव समितीचे सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!