Wednesday, September 23, 2026
Homeगोंदियाप्रेमसंबंधातून मारहाण केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

प्रेमसंबंधातून मारहाण केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाला घेऊन भावाने मारहाण करून धमकी दिल्याने तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील विजयनगर परिसरातील भगतसिंग वॉर्ड येथे बुधवारी ८ जानेवारीच्या सायंकाळी घडली.रितिक भीवराम क्षीरसागर वय २५ वर्षे,रा.विजयनगर,भगतसिंह वॉर्ड असे मृत तरुणाचे नाव आहे.
रितिकचे मोहल्ल्यातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.याबाबत मुलीच्या भावाला माहिती पडले व त्याने रितिकला मारहाण करून धमकी दिली होती.यावरून रितिकने बुधवारच्या सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.फिर्यादी भीवराम भोजराज क्षीरसागर वय ५२ वर्षे,रा.विजयनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मार्ग नोंद केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!