Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजपोलीस मदत केंद्र ११२ क्रमांकावर पोलीस प्रशासनातील अनुभवी व्यक्ती असणे आवश्यक…-अन्यथा अती...

पोलीस मदत केंद्र ११२ क्रमांकावर पोलीस प्रशासनातील अनुभवी व्यक्ती असणे आवश्यक…-अन्यथा अती उताविळपणा एक दिवस येणार अंगलट…देसाईगंज तालुक्यातील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- कुठल्याही पोलीस प्रशासनातील अती तात्काळ व जलद गतीने मदत मिळणारे केंद्र म्हणजे ११२ क्रमांक आहे.गोर-गरीब असो नाहीतर सर्वसामान्य नागरिक असो वा कुठलाही बलाढ्य व्यक्ती असो; त्याचप्रमाणे कुणीही असो; त्यात कसलाही भेदभाव केला जात नसून संबंधित क्षेत्रातील पोलीस प्रशासनास पाचारण करून निराकरण केले जात आहे.अशातच अती तात्काळ पोलीस मदत केंद्र ११२ क्रमांकावर पोलीस प्रशासनातील जुने वा ज्यांना कळतेय की,एखादे प्रकरण कसे हाताळावे; असे अनुभवी व्यक्ती ठेवले जात नसल्याने अती उताविळपणा करणाऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याने एक दिवस अंगलट येणार असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार पोलीस मदत केंद्र ११२ हे केवळ महिलांसाठी नाही तर सर्वांसाठी आहे.एखादा अनुचित प्रकार घडला तर अती तात्काळ मदत केंद्र म्हणून ११२ क्रमांकावर सुजाण नागरिक तसेच ज्यांना याची जाणीव आहे; असे सर्वजण संपर्क साधून तक्रारीचे निराकरण करून; ठाण्यात आपली बाजू वा मते सादर करून आपले हक्क बजावू शकतात; मात्र देसाईगंज तालुक्यातील ज्याला अनुभव आहे किंवा नाही; अशा कार्यकर्त्याने चक्क एका पत्रकाराला ११२ हे वाहन केवळ महिलांसाठीच मदत कार्य करणारे वाहन असल्याची बतावणी केली असल्याने सदर व्यक्तीचा अती उताविळपणा दिसून येत आहे.त्याचबरोबर तक्रार कर्त्यासोबत अरेरावीची भाषा वापरणे, धमकीवजा बोलणी करणे,११२ क्रमांकाविषयी माहिती नसणे तसेच इतर बाबी अती उताविळपणा करणाऱ्यांना कळत नसल्याने पोलीस मदत केंद्र ११२ क्रमांकावर पोलीस प्रशासनातील अनुभवी व्यक्ती असणे आवश्यक आहे.अन्यथा याबाबत वरिष्ठांकडे ई-मेल तसेच पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!