Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलीस ठाणे तर्फे जाहीर आवाहन करताच अनेक व्हॉट्सॲप ग्रुप झाले 'ओन्ली...

देसाईगंज पोलीस ठाणे तर्फे जाहीर आवाहन करताच अनेक व्हॉट्सॲप ग्रुप झाले ‘ओन्ली फॉर ॲडमिन’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- १० मार्च ते ६ जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून,गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज,मंगळवारी जाहीर होणार आहे.आज, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून,पोलिसांनी खबरदारीचा इशारा म्हणून, व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून सामाजिक सौदार्य टिकविण्याच्या दृष्टीने व्हॉट्सॲप ग्रुप ‘ओन्ली फॉर ॲडमिन’ करावे; असे आवाहन करताच काल,सोमवारी ३ जून रोजी अनेक ग्रुपचे सेटिंग बदलून ‘ओन्ली फॉर ॲडमिन’ झाल्याचे बघायला मिळाले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हॉट्सॲप ग्रुप व इतर तत्सम अप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या,धर्माच्या भावना दुखावतील,अशा स्वरुपाच्या पोस्ट,कॉमेंट्स,स्टोरी,स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार माध्यमाद्वारे करू नयेत.तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये;डीजे वाजवणार नाहीत,फटाके फोडणार नाहीत.तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये; तसेच व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन यांनी ३ ते ६ जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ‘ओन्ली ॲडमिन’ करून बदल करून घ्यावा.जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही.

ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत देसाईगंज ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी आवाहन करताच काल,३ जून रोजी सोमवारी याचा परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!