Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार २०७ मतदारांची नोंद…- मतमोजणीच्या एकूण...

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार २०७ मतदारांची नोंद…- मतमोजणीच्या एकूण फेऱ्या किती?.. घ्या जाणून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- आज ४ जून रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून मत मोजणीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या 👇

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील आमगाव,आरमोरी,गडचिरोली,अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी वेगवेगळ्या कक्षात होणार आहे.यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबल लावण्यात आले आहेत. तसेच टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीसाठी १२ टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) साठी एक टेबल असे एकूण ९७ टेबल मतमोजणीसाठी लावण्यात आले आहे.आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या, आरमोरी २२ फेऱ्‍या,गडचिरोली २६, अहेरी २१, ब्रम्हपुरी २३ आणि चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या होणार आहेत. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.

एकूण मतदार व झालेले मतदान👇

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार २०७ मतदारांची नोंद आहे.यात ८ लक्ष १४ हजार ७६३ पुरुष मतदार, ८ लक्ष २ हजार ४३४ स्त्री मतदार तर १० इतर मतदार आहेत.यापैकी ५ लक्ष ९५ हजार ३१५ पुरुष मतदारांनी (७३.०७ टक्के), ५ लक्ष ६७ हजार १५६ स्त्री मतदारांनी (७०.६८ टक्के) तर ५ इतर नागरिक असे ११ लक्ष ६२ हजार ४७६ (७१.८८ टक्के) मतदारांनी १९ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या मतदान पक्रियेत मतदानाचा हक्क बजावला आहे. 

टपाली मतपत्रिका👇

८५ वर्षावरील वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान प्रथमच गृहभेटी देवून टपाली मतपत्रिकेवर घेण्यात आले होते.त्यांचे व अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या एकूण ४९३९ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच सेनादलात कर्तव्यावर असलेल्या मतदारांच्या ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतपत्रीकांची मतमोजणी करण्यात येणार आहे.आज रोजी पर्यंत सेनादलातील मतदारांच्या ७९३ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. 

मतदान केंद्र👇

लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण १८९१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते.यात आमगाव ३११,आरमोरी ३०२, गडचिरोली ३५६, अहेरी २९२, ब्रम्हपुरी ३१६ तर चिमुर विधानसभा मतदारसंघात ३१४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!