Sunday, September 13, 2026
Homeगोंदियापोलीस कर्मचारी सुशील रामटेके यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान...

पोलीस कर्मचारी सुशील रामटेके यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-नुकतेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून
गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्तम कामगिरी तथा सेवेबद्दल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यात अतिदुर्गम,आदिवासी व नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरी येथील सुशील रामटेके यांनी पोलीस विभागात उत्कृष्ट व अतुलनीय कार्य केल्याबद्दल गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पदक असलेले महासंचालक सन्मान चिन्ह १ मे महाराष्ट्र दिनी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सन्मान प्रसंगी गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा,माजी आमदार तथा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन,जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे उपस्थित होते.सुशील रामटेके यांनी अतिशय दुर्गम भागातील पोलीस स्टेशन येथे काम करतांना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे,सामाजिक उपक्रम व इतर सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सेवा कर्तव्य बजावले आहे.एक उत्तम सुस्वभावी,शांत, मनमिळावू व आपल्या विभागाशी सलोख्याचे संबंध निर्माण करणारे सुशील रामटेके असे त्यांचे व्यक्तिमत्व असून केशोरीचे सरपंच नंदकुमार पाटील गहाणे,जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे,घनश्याम धामट पंचायत समिती सदस्य,माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे,अनिल लाडे,योगेश नाकाडे राष्ट्रवादी नेते,चेतन समरीत व मित्र परिवांनी रामटेके यांचे अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!