Tuesday, September 1, 2026
Homeदेसाईगंजनैनपूर येथे ‘सामान्य ज्ञान’ स्पर्धेद्वारे शिवजयंती साजरी..

नैनपूर येथे ‘सामान्य ज्ञान’ स्पर्धेद्वारे शिवजयंती साजरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज, गुरुवार १९ फेब्रुवारीला देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे जगदंब ग्रुपच्या विद्यमाने भव्य ‘सामान्य ज्ञान’ स्पर्धेचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे, नैनपूरमधील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित या स्पर्धेत शिवकालीन इतिहास,गडकिल्ले,स्वराज्याची प्रशासन व्यवस्था या विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या ज्ञानाचे प्रभावी प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच शिक्षक गहाणे, शिक्षिका तृषाली,अपर्णा,प्राची व प्रियंका यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.यावेळी जगदंब ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलतांना मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी विद्यार्थ्यांना धैर्य,न्याय,नियम आणि राष्ट्रप्रेम ही छत्रपती शिवाजी महाराजांची चार मूलभूत मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले. “शिवराय केवळ इतिहासातच नाही,तर ते विचारात असून त्यांचे विचार आत्मसात केल्यासच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल,”असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक मंगेश तुपट  यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.तर नैनपूर येथील तरुणांनी एकत्र येत राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!