Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल-नक्षल चकमक.. पाच नक्षलवाद्यांचा खात्मा; २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त..

सुरक्षा दल-नक्षल चकमक.. पाच नक्षलवाद्यांचा खात्मा; २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून जवानांनी नक्षलवाद्यांचे २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त केले आहेत.त्याचबरोबर,जंगल परिसरातून ४५० आईडी(इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस) म्हणजेच स्फोटक सामग्री,जी मोठ्या हमल्याकरीता वापरण्यात येणार होती व ८१८ बीजीएल शेल आणि ८९९ बंडल कोडेक्ससह मोठ्या प्रमाणावर डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत.सदरची कारवाई ही बिजापूरच्या करेगुट्टा क्षेत्रातील घनदाट जंगल परिसरात करण्यात आली.गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी विशेष मोहिमेत सुरक्षा दलांना बिजापूरच्या जंगल भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे जवानांनी शोधमोहीम सुरू केली. जवानांची चाहूल लागताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंध गोळीबार सुरू केला.त्यास जवानांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले.यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.अद्याप मारल्या गेलेल्या पाच नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.परिसरात शोधमोहीम सुरू असून आणखी नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!