Monday, August 24, 2026
Homeभंडारानिर्दयी माता; पोटच्या गोळ्याला बेवारस सोडले..!

निर्दयी माता; पोटच्या गोळ्याला बेवारस सोडले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-नुकतेच जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कटंगी मार्गावरील शिवतीर्थ परिसरातील दुर्गा मातेच्या मंदिरात एका दिवासाचे नवजात बाळ मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.मानवी मनाला कीव येईल अशी धक्कादायक घटना मंगळवार ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास राजापूर-नाकाडोंगरी येथील मुख्य मार्गावरील श्री क्षेत्रात उघडकीस आली होती.मॉर्निंग वॉककरीता मंदिराच्या खुल्या परिसरात फेरफटका मारणाऱ्या स्थानिक नागरिकांना सदरची बाब लक्षात येताच तात्काळ गोबरवाही पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती.परिसरातील दुर्गा मातेच्या अलगद पायाजवळ कापडात गुंडाळून ठेवलेल्या त्या निष्पाप जीवाला कोण तिथे सोडून गेला?अश्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नसतांनाच परत काल मंगळवारी दुपारच्या सुमारास लाखनी तालुक्याच्या मानेगाव(सडक)येथील शेतशिवारालगतच्या नाल्याजवळ एका नवजात स्त्री जातीचे जिवंत बाळ चक्क स्कूल बॅगमध्ये बेवारस आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्याचे पीआय सुभाष बारसे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत तातडीने बाळाला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले.बॅगमध्ये आढळून आलेले बाळ हे आठ ते दहा दिवसांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर बाळास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. एखादी आई आपल्या पोटच्या गोळ्याला जन्मताच वा ममतेची छाया मिळण्यापूर्वीच असे बेवारसपणे फेकून देणे वा आपल्या छायेपासून दूरवर ठेवत असेल तर.. याच्यापेक्षा महाघोरकलयुग कोणता?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.चिमुकलीला बेवारसपणे फेकणाऱ्या निर्दयी मातेचा शोध लावण्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे असून प्रकरणाचा पुढील तपास मिलिंद गभणे व कऱ्हाडे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!