नागपूर :-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हिंगणा परिसरातील गोंडवाना पिंपरी,माय टाऊन सोसायटी,सेक्टर-८ येथील बंगला क्रमांक-१३३ येथे धाड मारून तब्बल २४ लाख ६७ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.प्रकरणी यातील मुख्य आरोपी फरार झाला,तर सहा जणांना अटक करण्यात आली आहे.त्याचबरोबर,घटनास्थळावरुन १ हजार ९० लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड,महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या गोवा व्हीस्कीच्या ३५६ बाटल्या,९० बिएल बनावट देशी दारु,इलेक्ट्रानिक बॉटल सिलींग मशिन,बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जीवंत पत्रीबुचे,रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टाग विदेशी दारुचे जीवंत प्लॉस्टीक जीवंत बुचे,चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ६७ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील ३१ वर्षीय मुख्य आरोपी शुभम गोविंद तिवारी फरार असून गोविंद रामदत्त तिवारी वय ५९ वर्षे,२४ वर्षीय शैलेंद्र धुर्वे,२१ वर्षीय रघुनाथ उईके,राजकुमार उईके वय २५ वर्षे,द्वारका शिवलाल इनवाती वय ४५ वर्षे व प्रमोद नथ्थुजी सयाम वय ४२ वर्षे या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक सुरज कुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर,दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, लांबाडे,निरीक्षक बालाजी चाळणेवार,दुय्यम निरीक्षक वैभव दीवाण,अमित क्षीरसागर,शुभम ढोके यांच्यासह राहुल सपकाळ,गजानन राठोड,सुधीर मानकर,किरण वैद्य,सचिन आडोळे,विनोद डुंबरे यांनी सदरची कारवाई पार पाडली.
- संपर्क साधण्याचे आवाहन👇

