Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरनदीच्या पुलावरून कोसळला ट्रक; चालकाचा मृत्यू..!

नदीच्या पुलावरून कोसळला ट्रक; चालकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्घूस शहराजवळील
 बेलोरा पुलावरून अनियंत्रित झालेला ट्रक थेट ८० फूट खोल वर्धा नदी पात्रात कोसळल्याची घटना आज,शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.यात १८ चाकी ट्रकचा समोरील भाग चक्काचूर होऊन चालक केबिनमध्येच अडकून राहिला.प्रशासनाने चालकास वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. राजा यादव वय ३९ वर्षे रा.शास्त्री नगर,घुग्घूस असे अपघातात मृत पावलेल्या चालकाचे नाव आहे.
एमएच-३४ बी झेड १४०२ क्रमांकाचा १८ चाकी मालवाहू ट्रक आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
वेकोलीच्या WCL नायगाव खाणीत कोळसा भरण्यासाठी जात होता.जात असतांना पुलावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा  ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट पुलावरील रेलिंग तोडून वर्धा नदीत कोसळला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत प्रशासनास माहिती दिली.काही वेळातच मोठ्या संख्येने घटनास्थळी नागरिक गोळा झाले.वेकोलि प्रशासन घटनास्थळी गॅस कटर,हायड्रा मशीन,ऑक्सिजन मशीन, व्हेंटिलेटर,डॉक्टर इत्यादींना बोलावून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.शिरपूर पोलिस आणि घुघुस पोलिसही केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.घटनेला चार तासांहून अधिक काळ लोटून ट्रक चालक राजा यादव केबिनमध्ये अडकून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत श्वास घेत होता.जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालक राजा यादव याला बाहेर काढण्यात यश आले.तोपर्यंत तो गंभीर जखमी अवस्थेत होता.राजा यादव याला तातडीने घुग्घूस येथील राजीव रतन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरपूरचे पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी वणी नगर परिषदेतून स्पायडर कटर मशीन बोलावून केबिन कापून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला.पण चालकाने अखेरचा श्वास घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!