Wednesday, September 9, 2026
Homeभंडारानकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय; शंभर रुपयाच्या नकली नोट नंतर आता...

नकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय; शंभर रुपयाच्या नकली नोट नंतर आता दोनशे रुपयांची नकली नोट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरात मागील आठवड्यात शंभर रूपयांची एक नकली नोट आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता परत एक दोनशे रूपयांची नकली नोट सापडल्याने चलनात नकली नोटा आणणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता नकली नोटा आणणाऱ्या तसेच छपाई करणाऱ्या अज्ञात टोळीचा मागोवा घेऊन,अशांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे.दोन दिवसांपूर्वी भंडारा शहरातील एका औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या चक्रधर नामक तरुणाकडे चलनातून दोनशे रुपयांची नोट आली होती.तो नेहमीप्रमाणे बँकेत रक्कम भरण्यासाठी गेला असता, बैंक कर्मचाऱ्याने तपासून ती बनावट असल्याचे सांगून त्याला परत केली.मात्र,ही नोट नेमकी कुणाकडून आली,याचा मागोवा घेणे आता कठीण झाले आहे. अशा बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात असतील,तर नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आढळलेल्या दोनशेच्या नोटेवरील वॉटरमार्कमध्ये महात्मा गांधींची प्रतिमा नाही.मूळ नोटेपेक्षा कागद पातळ व निकृष्ट दर्जाचा असून रंगसंगती व छपाई संशयास्पद असल्याने पटकन लक्षात आले.हळूहळू एक-एक नकली नोटा उघडकीस येऊ लागल्याने जवळ असलेली नोट नकली तर नाही ना? म्हणून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!