Friday, October 16, 2026
Homeनागपूरधक्कादायक…! सुनेने संपत्तीसाठी सासऱ्याच्या हत्येची दिली सुपारी…-सुरुवातीला सासऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा केला...

धक्कादायक…! सुनेने संपत्तीसाठी सासऱ्याच्या हत्येची दिली सुपारी…-सुरुवातीला सासऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा केला बनाव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- ३०० कोटींच्या संपत्तीसाठी सुनेने तिच्या सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे.सुरुवातीला सासऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र,एक संशय आणि सुनेचा संपूर्ण प्लानच चौपट झाला.पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे.

२२ मे रोजी नागपुरच्या मानेवाडी परिसरात पुरुषोत्तम पट्टेवार वय ८२ वर्षे यांना एका कारने जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.पोलिसांनी सुरुवातीला त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती.या घटनेनंतर पट्टेवार यांच्या भावाने पोलिसांकडे मृत्यूबाबत संशय व्यक्त केला.पोलिसांनी जेव्हा त्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटिव्हीची पडताळणी करण्यास सुरुवात केली.तेव्हा या सीसीटिव्ही पाहिल्यानंतर त्यांनी कार ड्रायव्हर नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी करण्यात आली.तेव्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला.कार चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,अर्चना पुट्टेवार यांनी पैसे देऊन त्यांच्या सासऱ्यांचा अपघात घडवून आणण्यास सांगितले होते.त्यांचा हा खुलासा ऐकुन पोलिसांनाही धक्का बसला.पोलिसांनी सुपारी किलिंग प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुरुषोत्तम यांच्या ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना हिची नजर होती.विशेष म्हणजे अर्चना या सरकारी अधिकारी असल्याचेही समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हे मुलगी योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे संपत्ती करणार असल्याची कुणकुण अर्चना यांना लागली होती.त्यामुळे संपत्ती हातातून जावू नये; यासाठी तिने हा सगळा कट रचला. नागपूर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,हे प्रकरण हायप्रोफाइल आहे. नागपुर क्राइम ब्रँच या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.आत्तापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे.लवकरच या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना अटक केली जाणार;  अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!