Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडामहिलेच्या पोटात सुरू झाला तीव्र त्रास; महिला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल…-अन् गर्भाशयातून...

महिलेच्या पोटात सुरू झाला तीव्र त्रास; महिला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल…-अन् गर्भाशयातून निघाला गोळा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :-कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथील सुनीता नरेंद्र शेंडे वय ३२ वर्षे या महिलेच्या पोटात तीव्र त्रास सुरू झाल्यामुळे तिला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आकाश डोंगरावर यांनी तिची तपासणी करून उपचार सुरू केले.नंतर त्यांनी तिला सोनोग्राफी काढण्याचा सल्ला दिला.सोनोग्राफीनंतर गर्भाशयाच्या फायब्रॉइडवर सुजन असल्याचे समजले. त्याकरिता मोठी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. उपजिल्हा रुग्णालय स्तरावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया शक्य नव्हती.परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके यांच्या मार्गदर्शनात डॉ.आकाश डोंगरवार यांनी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे सदर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजित केले.त्यासाठी रक्ताची जुळवा-जुळव करून बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. स्वप्नील मेश्राम यांच्या मदतीने रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू केली.तब्बल दोन तास चाललेल्या शस्त्रक्रिये दरम्यान महिलेच्या गर्भशयातून दीड किलो मासाचा गोळा काढण्यात आला.एवढी मोठी व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पहिल्यांदाच करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ठमके यांनी सांगितले.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!