- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या तरुणाने चक्क मंदिरातील देवासमक्ष स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील ‘लहान महादेव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायमुख देवस्थान येथील चौरागड टेकडी मंदिरात उघडकीस आली. कैलास सेवकराम सिंगणजुडे वय ३८ वर्षे,रा.हसारा, ता.तुमसर, जि.भंडारा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो दीर्घकाळ असलेले उपचार आणि शरीरातील तीव्र वेदनांमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता.सततच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.काल सोमवारी सकाळच्या सुमारास दोन तरुण टेकडीवरील चौरागड मंदिरात पूजेसाठी गेले असता,त्यांना मंदिराच्या आवारात एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.सदरची माहिती मंदिराच्या पुजाऱ्याला दिली.पुजाऱ्याने घटनेचे गांभीर्य ओळखून आंधळगाव पोलिसांना पाचारण केले.पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.प्राथमिक तपासादरम्यान मृतकाच्या हातावर त्याचे पूर्ण नाव आणि गाव लिहिलेले आढळले,ज्यावरून त्याची ओळख पटली.प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.मृतक कैलास शिंगणजुडे हे गेल्या काही काळापासून कर्करोग सदृश गंभीर आजाराने त्रस्त होते.या आजाराच्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे,असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.कैलास यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

