Monday, September 7, 2026
Homeगोंदियामॅडम सापडल्या,मॅडम सापडल्या म्हणून सर्वत्र बोंबाबोंब; दोन हजाराची लाच भोवली..

मॅडम सापडल्या,मॅडम सापडल्या म्हणून सर्वत्र बोंबाबोंब; दोन हजाराची लाच भोवली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी नसते वा ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा ते त्याहून अधिक वर्ष झालेली असते,अश्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या बरोबर लाभ देण्यासाठी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जातो.यात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मोडतात.यामुळे त्यांच्या वेतनात वाढ होत असते.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील सातगाव-साखरीटोला येथील श्री विद्या गर्ल्स हायस्कूल येथे सन १९९७ पासून परिचर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांचे १ जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ पावेतो १६ महिन्यांचे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाच्या फरकाचे थकीत बिल काढण्यासाठी मुख्याध्यापिकाने पाच हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी दोन हजार रुपये शाळेतील परिचर याच्या मार्फतीने घेताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही रंगेहाथ अटक केली.सदरची कारवाई गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील सातगाव-साखरीटोला येथील श्री विद्या गर्ल्स हायस्कूल शाळेत काल सोमवारी करण्यात आली.प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका अजया जागेश्वर चुटे वय ४३ वर्षे व परिचर देवराज अनंतराम चिंधालोरे वय ५८ वर्षे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तक्रारदार हे श्री विद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये परिचर पदावर कार्यरत आहेत.थकीत बिल काढण्यासाठी मुख्याध्यापिका अजया चुटे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांची मागणी केली.त्यातील दोन हजार रुपये देवराज चिंधालोरे यांच्या मार्फत स्विकारून उर्वरित तीन हजार रुपये पगार झाल्यावर द्या,असे म्हणाले.तक्रारदारांने काल सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली. पथकाने पडताळणी केली असता,मुख्याध्यापिका चुटे यांनी देवराज मार्फत दोन हजार रुपये स्विकारल्याचे मान्य करून उर्वरित तीन हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली.पथकाने शाळेतच सापळा लावून देवराज चिंधालोरे याला रंगेहाथ पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि मॅडम सापडल्या,मॅडम सापडल्या म्हणून सर्वत्र बोंबाबोंब झाली.प्रकरणी दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!