Thursday, September 10, 2026
Homeभंडाराधक्कादायक घटना...! गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्यांनी चढवला हल्ला; २५ शेळ्या केल्या फस्त..

धक्कादायक घटना…! गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्यांनी चढवला हल्ला; २५ शेळ्या केल्या फस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर
तालुक्यातील मोहरणा येथे धक्कादायक घटना घडली. घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर १० ते १२ लांडग्यांनी हल्ला चढवून २५ शेळ्यांचा फडशा पाडला.यात सोनाबाई भैय्याजी शंभरकर या शेळीपालक महिलेचे दोन लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे.
वनपरिक्षेत्र लाखांदूर,जि.भंडारा अंतर्गत येत असलेल्या मोहरणा परिसरात लांडग्यांची संख्या अधिक वाढली आहे.परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात शेळ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.मोहरणा येथील सोनाबाई भैय्याजी शंभरकर या शेळी पालनाचा व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह करतात.रात्रीच्या सुमारास दहा ते बारा लांडग्यांनी गोठ्यात बांधलेल्या शेळयांवर हल्ला चढवून २५ शेळ्यांचा जागीच फडशा पाडला. लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात सर्वत्र मृत शेळ्यांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत पडून होते.
घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली.वनरक्षक जी.डी.हत्ते यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.मोहरणा परिसरात लांडग्यांच्या हैदोसामुळे शेळीपालक त्रस्त झाल्याने वन विभागाने बंदोबस्त करावा तसेच सोनाबाई शंभरकर यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!