Sunday, July 26, 2026
Homeभंडारादोन शेतकऱ्यांनी कर्जापायी एक दिवसा आड गळफास लावून केली आत्महत्या- लाखांदूर तालुक्यातील...

दोन शेतकऱ्यांनी कर्जापायी एक दिवसा आड गळफास लावून केली आत्महत्या- लाखांदूर तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा(लाखांदूर) :- शेतकरी बांधवांच्या व्यथा कोण ऐकणार? कधी सततची नापिकी,अवकाळी पाऊस,गारपीट, किडीचा प्रादुर्भाव,मालाला योग्य हमीभाव नाही,बँकांचे कर्जाचे डोंगर व इतर अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच चालले जात आहे.अशाच प्रकारे लाखांदूर तालुक्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी शेतशिवारातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अनुक्रमे शुक्रवारी व शनिवारी घडली.असल्याने दोन्ही गावात शेतकरी आत्महत्या मुळे शोककळा पसरली आहे.

सुधाकर लक्ष्मण मेश्राम वय ६२ वर्षे रा. पिंपळगाव कोहळ, सारंगधर विठोबा मेश्राम वय ६० रा.किरमटी अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.१७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सुधाकर मेश्राम यांनी दोन वर्षापासूनची नापिकी व कर्जाच्या तणावातून शेतशिवारातील झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.सुधाकर यांच्या नावे पावणे दोन एकर शेती असून सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती आहे.तर दुसऱ्या घटनेत किरमटी येथे घरासाठी घेतलेले कर्ज फेडणे डोईजड झाल्याने शनिवारी १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सारंगधर विठोबा मेश्राम याने शेतशिवारात फणसाच्या झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.पोलिस सूत्रानुसार,त्यांच्यावर खासगी फायनान्स कंपनीचे १ लाख ३० हजार रुपयांचे व इतर खासगी कर्ज असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!