Saturday, October 17, 2026
Homeभंडारादेहविक्रीचा पर्दाफाश; महिला अटकेत..!

देहविक्रीचा पर्दाफाश; महिला अटकेत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या शहरातील देहविक्रिचा पर्दाफाश करण्यात भंडारा जिल्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास यश आले आहे.प्रकरणी पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर देहव्यापार चालवणाऱ्या महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे.संगीता विलास धारगावे वय ४० वर्षे,असे अटकेतील आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळावरून २ हजार ३० रुपयांच्या रोख रकमेसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला काल शनिवारी भंडारा शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्ड,विद्यानगर येथे एका घरामध्ये अवैध देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार,पथकाने सर्वप्रथम माहितीची खातरजमा करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला पाठवले.बनावट ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी घरामध्ये छापा टाकला.यावेळी आरोपी महिला संगीता विलास धारगावे ही आपल्या स्वतःच्या राहत्या घरी पीडित महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे दिसून आले.लागलीच पथकाने झडती करून घटनास्थळावरून रोख रकमेसह इतर मुद्देमाल जप्त केला व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पुंजरवाड,अंकुश गाढवे,अंकोश पुराम,योगेश ढबाले, कौशिक गजभिये तसेच महिला पोलिस अंमलदार अर्चना कुथे,मंजुषा घरडे,मानिक किरसान यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!