Tuesday, October 6, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरातील नवीन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करा- माजी नगरसेवक तथा आरोग्य...

देसाईगंज शहरातील नवीन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करा- माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख व मुख्य बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज येथे सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या व शहरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये; याकरिता देसाईगंज येथील नविन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी देसाईगंज नगरपरिषदेचे माजी नगसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे यांनी केली आहे.

देसाईगंज याठिकाणी गडचिरोली,कुरखेडा,लाखांदुर,ब्रम्हपुरी व इतर ठिकाणांहून दररोज प्रवाशी नागरिक,व्यापारी वर्ग व इतर जनता कामाकरिता ये-जा करीत असतात. मात्र देसाईगंज येथे सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने मुख्य मार्गावरच प्रवाशी नागरिकांच्या बघ्यांची गर्दी वा झुंबड दररोज पहावयास मिळते.अशी झुंबड वा गर्दी देसाईगंजच्या जुन्या बसस्थानकावर असल्याने केव्हा-केव्हा वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने देसाईगंज येथे नवीन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करावे असे खरकाटे यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!