Friday, August 28, 2026
Homeचंद्रपूरदुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक; दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू..

दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक; दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार ११ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मूल-चिचाळा मार्गावरील महाबीज केंद्राजवळ घडली.अनिल मडावी वय ३७ वर्षे व मुन्ना पोरते वय ३५ वर्षे दोघेही रा.थेरगांव,ता.मूल,जि.चंद्रपूर असे अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
अनिल मडावी व मुन्ना पोरते हे आज गुरुवारी दोघेही एमएच ३४ बीपी ९०३५ क्रमांकाच्या दुचाकीने मूल येथे काही कामानिमित्त गेले होते.कामे आटोपून आपल्या गावी परत जात असतांनाच ताडाळा कडुन मूलकडे येत असलेल्या एमएच ३४ बीझेड ३३२३ क्रमांकाच्या
चारचाकी वाहन व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली.धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाले.घटना घडताच चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.लागलीच घटनेची माहिती मूल पोलीस प्रशासनास मिळताच ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुबोध वंजारी यांनी घटनास्थळ गाठुन घटनेचा पंचनामा केला व मृतकांचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.प्रकरणी घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेऊन चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.घटनेचा पुढील तपास मूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक अंमलदार केळझरकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!