Thursday, May 28, 2026
Homeभंडारादुचाकीला धडक; आईचा जागीच मृत्यू तर मुलगा थोडक्यात बचावला..

दुचाकीला धडक; आईचा जागीच मृत्यू तर मुलगा थोडक्यात बचावला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सितेपार गावालगत आज,शनिवार १३ डिसेंबरला सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.मुलगा व त्याची आई दुचाकीने जात असतांना दुचाकीला टिप्परची धडक होऊन आई आणि मुलगा खाली कोसळताच आईच्या डोक्यावरून चालत्या टिप्परचे चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर मुलगा थोडक्यात बचावून किरकोळ जखमी झाला.निलाबाई फंदु कटनकार वय ७० वर्षे,रा.चुल्हाड,ता.तुमसर,जि.भंडारा असे मृत पावलेल्या आईचे नाव असून विलास फंदु कटनकार असे अपघातातील जखमी मुलाचे नाव आहे.प्रकरणी गोंदेखारी येथील रमेश बनकर यांच्या मालकीचा असलेला टिप्पर सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेत चालक धर्मेंद्र राऊत रा.गर्रा बघेडा,ता.तुमसर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
निलाबाई आणि तिचा मुलगा विलास हे दोघेही एमएच ३६ एक्यू ७९८३ क्रमांकाच्या दुचाकीने मुंढरी गावी जाण्यासाठी निघाले होते.अश्यातच सितेपार गावालगत येताच सितेपारकडून एमएच ४० बीजी ०१८० क्रमांकाचा टिप्पर भरधाव वेगाने येत दुचाकीला धडक दिली.यात दोघेही खाली पडले. निलाबाई रस्त्याच्या भागावर पडल्याने तिच्या डोक्यावरून टिप्परचा चाक गेला.यातच तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती सिहोरा पोलीस ठाण्यास मिळताच सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी घटनास्थळ गाठून अपघातातील टिप्पर ताब्यात घेतले.प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय चेतन पटले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!