- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-दुचाकीने स्वगावी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने झडप घालून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील धानापुर गावाजवळ घडली.तर गंभीर जखमी पत्नीचा पुढील उपचारार्थ रुग्णालयात हलविले असता वाटेतच मृत्यू झाला,तर यात त्यांची सहा वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली.गौतम सुरेश निमसरकर वय ३६ वर्षे,रा.अनखोडा,ता.चामोर्शी, जि.गडचिरोली व वैशाली गौतम निमसरकर वय ३० वर्षे असे अपघातात मृत पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे,तर सिया गौतम निमसरकर वय ६ वर्षे असे अपघातात बचावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील निमसरकर कुटूंबीय एमएच ३३ एबी ८०६७ क्रमांकाच्या दुचाकीने चंद्रपूरहून स्वगावी जाण्यासाठी निघाले होते.दरम्यान,गोंडपिपरी तालुक्याच्या धानापुर येथील जिनिंगजवळ येताच एमएच ३४ एबी २३२४ क्रमांकाच्या भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की गौतम निमसरकर हे जागीच गतप्राण झाले.तर गंभीर जखमी झालेल्या वैशाली निमसरकर यांना तात्काळ गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांनाच मृत्यू झाला.
- Advertisement -

