Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरट्युशनसाठी घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकास बेड्या..!

ट्युशनसाठी घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकास बेड्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच काही दिवसांपूर्वी चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या एका शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतांनाच ट्युशनसाठी घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.राजेश दामोदर बट्टे वय ३४ वर्षे असे शिक्षकाचे नाव असून,तो बल्लारपूर शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षक आहे.घटनेची माहिती पालकांना कळताच तक्रार दाखल केली.प्रकरणी बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे अप.क्रं.५५६/२०२५ अन्वये भारतीय नवीन दंड संहिता अंतर्गत कलम ६४ (१),६४ (२)(फ),६५(२),१२७ (२),३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पोक्सो अंतर्गत कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे
पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक करिश्मा बी.मोरे करीत आहेत.पीडित मुलगी ही शिक्षकाच्या घरी ट्युशनसाठी जात होती.यादरम्यान आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.याची भनक कुटुंबीयांना लागताच तक्रार दाखल केली.ज्यांच्यावर विश्वास ठेवून पालक वर्ग आपल्या पाल्यांना ज्ञानार्जनासाठी पाठवतात,त्यांचेच शोषण केले जात असेल,तर एवढे मोठे पाप कसे फेडणार? घटनेमुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!