- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-लग्नातून जेवण करून आलेल्या शंभराहून अधिक नातेवाइकांना रात्रभर ताप,हगवण,उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने काल शुक्रवारी सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड आणि बेड अत्यवस्थ रुग्णांनी फुल्ल झाले आहे.सध्या यातील ३२ रुग्णांवर उपचार सुरू असून तीन रुग्णांना नागपूरला हलविण्यात आले आहे.अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.गुरुवारी भिवापूर येथील स्थानिक जिचकार सभागृह येथे तिलक वाघमारे रा.भिवापूर यांच्या मुलीचे लग्न होते.वऱ्हाडी व आप्तेष्ट मंडळींनी जेवण केल्यानंतर लग्नातील शिल्लक अन्न वधूमंडळींनी घरी नेले. रात्रीला हेच अन्न खाऊन सर्व झोपी गेले.त्यानंतर अनेकांना रात्रभर हगवण,उलट्या आणि तापाने बेजारून सोडले.काल शुक्रवारी सकाळपासून एका पाठोपाठ एक नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊ लागले.एवढेच काय तर लग्नात जेवण केलेल्या स्थानिकांनादेखील त्रास जाणवू लागला.हा प्रकार लक्षात येताच,आरोग्य यंत्रणा कामाला लागली. डॉक्टरांची धडपड सुरू झाली.रेकॉर्डवर ३२ रुग्णांची नोंद असली तरी प्रत्यक्षात शंभराहून अधिकांना लग्नातील जेवणातून बाधा झाली आहे.ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपनिरीक्षक रमेश येडे,प्रवीण जाधव तपास करीत आहेत.पथक रुग्णालयात रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी डॉ.केवल कोरडे,डॉ.आदित्य असवार यांची दिवसभर धडपड सुरू होती.सायंकाळी जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांचे पथक ग्रामीण रुग्णालयात पोहोचले.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीषा लोंढे यांनी रुग्णांची विचारपूस करीत,बाधा कशामुळे झाली? याबाबत माहिती जाणून घेतली.
- ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेली रुग्ण👇
मोरेश्वर तुपटे वय ४८ वर्षे,विद्या तुपटे (४५),सुधांशू तुपटे (१५),योगिता तुपटे (१७), कोमल नागपुरे (२२), भूषण नागपुरे (१५),वनिता मांढरे (३७),प्रियांका वाघमारे (१५),पुष्पा वाघमारे (४५),दिव्या वाघमारे (१५), हर्षदा मांढरे (१७), मीना भलवे (४८), आनंदी वाघमारे (१३), सोनू मांढरे (१८), यश मोहनकर (२०), सीमा अंबादे (४०), जानु मांढरे (१३), तन्मय जनबंधू (२१), मृणाल पांडे (२५), श्रद्धा चाचरकर (१७) सर्व रा.भिवापूर,नलु नागपुरे (४०) रा.बोथली जि.चंद्रपूर, शालू चाचरकर (३५) रा.नांद, प्रियांशू उके (१५) रा. उमरेड,पलक मोहनकर (१५) रा.सातगाव बुटीबोरी, दिगांबर करणुके (४०), प्रणिता करणुके (३२) दोन्ही रा. नागपूर, मयुरी दुधपचारे (२३) रा.सुरादेवी कामठी, गिरजा नागपुरे (६५) रा.बोथली जि.चंद्रपूर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून राशी जनबंधू (२३), कुंदा लिंगायत (६०) दोन्ही रा.भिवापूर व कलाबाई श्रीरामे (७०) रा.तास यांना नागपूरला रेफर करण्यात आले.
- Advertisement -

