उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज गारांसह मुसळधार पाऊस झाला.जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह कोरपणा तालुक्यात तुफान गारपीट झाली.अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला.सध्या शेतात मिरची,मका, हरबरा,ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिके उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडल्याने याचे नवल वाटत आहे.

